मराठा आरक्षण : नगरमध्ये भाजपचा जल्लोष


नगर - मराठा समाजास टक्के आरक्षण विधानसभा व विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यावर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने लक्ष्मी करंजा येथील कार्यालयात फटाके वाजवून व ढोल ताशाच्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी खासदार दिलीप गांधी, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सरचिटणीस किशोर बोरा, गटनेते सुवेंद्र गांधी, नरेंद्र कुलकर्णी, चेतन  जग्गी, नाना भोरे, संपत नलावडे, मालन ढोणे, किशोर वाकळे, गौतम दिक्षित, नितीन शेलार, आर.पी.आय चे अजय साळवे आदींसह कार्त्याकर्ते उपस्थित होते

खा.गांधी म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हा निर्णय आहे. राज्याच्या स्थापणे पासून राज्यात कॉंग्रेसचीच सत्ता होती. पण मराठा समाजास न्याय देऊ शकले नाही. मात्र भाजपच्या सरकारने केवळ चार वर्षात हा महात्वाचा प्रश्न सोडून मराठा समाजास १६ टक्के अरक्षन आज दिले आहे.

मुख्यमंत्रीनी हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून सर्वाना विश्वासात घेऊन अरक्षनस मंजुरी दिली आहे. हे करतांना दुस-या कोणावरही अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली आहे. या एतेहासिक निर्णय बद्दल नगर भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्रीचे व त्यांच्या सर्व सहका-यांचे अभिनंदन करत जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत करत आहोत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या