नगरमध्ये राष्ट्रवादीला झटका, उमेदवाराचा भाजपात प्रवेशनगर : महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्टरवादी काँग्रेसला चांगलाच झटका दिला आहे. प्रभाग ४ ड मधून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या विनय वाखुरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.

विनय वाखुरे हे प्रभाग ४ मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे आहेत. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका इंदरकौर गंभीर यांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळाला होता. एकाच वेळी दोघांना एबी फॉर्म असल्याने अगोदर एबी फॉर्म मिळालेल्या वाखुरे यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला.

त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ गंभीर यांच्यावर आली आहे. दानवे यांच्या उपस्थितीत भिस्तबाग चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी, पक्ष निरीक्षक आ. सुरजितसिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत वाखुरे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. उद्या माघारीचा अंतिम दिवस असून, कोण कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या