नगरमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष; भाजपला धक्कानगर : महानगरपालिकेसाठी दाखल शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवार बाळासाहेब बोराटे यांचा उमेदवारी अर्ज संभाजीनगर खंडपीठात वैध ठरवला आहे. यानंतर नगर येथील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष साजरा केला.

तसेच भाजपचे सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी, प्रदिप परदेशी तसेच राष्ट्रवादीचे डॉ. योगेश चिपाडे यांचा अर्जही वैध ठरवण्यात आला असून भाजपचे सुरेश खरपुडे यांचा अर्ज मात्र बाद ठरवण्यात आल्याने भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.

बाळासाहेब बोराटे यांच्या विरोधात अनधिकृत टॉवरचा विषय घेऊन राष्ट्रवादीने तक्रार दाखल केली होती. बोराटे यांच्या विरोधात नगर येथे निकाल लागला. त्यांनी संभाजीनगर खंडपीठामध्ये आव्हान दिल्यानंतर सोमवारी त्याच्यावर सुनावणी झाली. संभाजीनगर खंडपीठाने त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवल्यानंतर येथील माळीवाडा भागांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या