अहमदनगर : शक्तिप्रदर्शन करत भाजपने फोडला प्रचाराचा नारळनगर : महानगरपालिका निवडणुकीसाठी नगर शहरातून मोटारसायकल रॅली काढत भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा नारळ फोडला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपने विशाल गणेशाची आरती करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

मोटारसायकल रॅलीत पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी, पक्ष निरीक्षक आ. सुरजितसिंग ठाकूर आदींसह पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सायंकाळी भिस्तबाग चौकात सभा घेण्यात येत आहे. या सभेत दानवे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या