मनपा निवडणूक - प्रचारासाठी भाजपचे मंत्री, खासदार आमदार नगरला


नगर - महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख मंत्री, प्रदेशाचे पदाधिकारी, खासदार आमदार नगरला येणार आहेत. जिंकण्याच्या उद्देशानेच भारतीय जनता पार्टी रणांगणात उतरली आहे. आमचाच महापौर होणार हे निश्चित आहे, असा विश्वास खासदार दिलीप गांधी यांनी शनिवारी दुपारी अायोजित पत्रकार परिषदेत दिला.

नगरचे जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी चांगले काम करत आहेत. मात्र त्यांचे खालचे काही  अधिकारी त्यांच्याप्रमाणे नाहीत. निवडणुकीसाठी उमेदवारांना, पक्षांना बारीक सारीक गोष्टींकरता तसेच परवानग्या घेण्यासाठी सहकार्य न करता अधिकारी वेठीस धरले. आधीच किचकट फॉर्म प्रक्रिया मुळे उमेदवारांचा वेळ वाया गेला. आता प्रचाराच्या परवानग्यासाठी प्रशासनाने ताबडतोब एक खिडकी योजना सुरू करावी ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे.

केडगाव येथे झालेल्या पक्षप्रवेश बद्दल बोलताना गांधी म्हणाले , भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीने व सर्वांच्या संमतीने केडगाव मध्ये केडगाव बाबत निर्णय घेतला. या निर्णयामुळे पक्षाचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले, त्यांची समजूत  आम्ही काढली आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्थापने नंतर प्रथमच महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागांवर पक्षाने उमेदवार दिले आहेत. पक्षाची ताकद शहरात वाढली असून प्रत्येक प्रभागात उमेदवार देणे म्हणजे पक्षसंघटन मजबूत झाल्याचे प्रतीक आहे.

शिवसेनेने अयोध्या बद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल बोलताना खासदार गांधी म्हणाले , आम्ही  भारतीय जनता पार्टीचे सर्वजण पूर्वीपासूनच हे रामाचे भक्त आहोत. जय श्रीराम नावाचा जयघोष करतच आम्ही सर्व कामास सुरवात करत असतो.  राम मंदिराचा मुद्दा सर्वप्रथम भाजपाचे पितामह लालकृष्ण अडवाणी यांनी उपस्थित केला . त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे मंदिर उभारणार असून  पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत नक्कीच निर्णय घेऊन मंदीर पूर्ण करतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . 

यावेळी शहर सरचिटणीस किशोर बोरा यांनी प्रास्ताविक केले. गौतम दीक्षित यांनी आभार मानले.  यावेळी जगन्नाथ निंबाळकर, श्रीकांत साठे,  सुनील काळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या