नरक चतुर्दशीला मनुवादी वृत्तीचे प्रतिकात्मक दहन


अहमदनगर - बलीप्रतिपदेला बळीराजाच्या झालेल्या हत्येच्या निषेध व्यक्त करीत शबरीमाला प्रकरणात डोके वर काढणार्‍या मनुवादी वृत्तीचे विद्रोही विचारमंचच्या वतीने प्रतिकात्मक दहन करण्यात आले. तर ईडापिडा टळून बळीचे राज्य येण्याची घोषणा करण्यात आली.
 अरणगाव रोड येथील इंदिरा नगर येथे जालिंदर चोभे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नरक चतुर्दशीला हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये चंद्रकांत बिरारे, अमोल भालसिंग, बाळासाहेब तिजोरे, जीवन कांबळे, दिपक भिंगारदिवे, विनोद  जाधव, अमोल मीरपगार, नितीन तेलधुणे, अमोल तिजोरे, अभिषेक कदम आदींसह परिसरातील युवक सहभागी झाले होते.
महिलांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत सुप्रिम कोर्टाचे आदेश असतानाही गोंधळ घालून न्यायालयाचा अवमान केला जात आहे. महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश मनुवादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. तेथील राज्यसरकारचे पोलीस हतबल झाले असून, न्यायालयाचा अवमान होणे हे लोकशाहीला घातक आहे. याबाबत सर्व राजकीय मंडळी मौन धरुन आहेत. पुन्हा मनुवादी विचारसरणी समाजात सक्रीय होत असल्याने या प्रवृत्तीचे दहन करण्यात आल्याचे विद्रोही विचारमंचच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या