कोण म्हणतो धोनी संपला ?


नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी एक्का असलेला माजी 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी संपला काय की काय ? भारतीय संघातून डच्चू मिळाल्यानंतर तर अशा कुचर्चांना अधिक जोर आला होता. मात्र दस्तुरखुद्द धोनी यानेच स्वतःच संघापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, असे आता समोर आले आहे.

(आमचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा)

महेंद्रसिंग धोनी सध्या रांचीमध्ये डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना एकत्र करून फलंदाजीचा कसून सराव करत आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज शहाबाज नदीम आणि १९ वर्षांखालील डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना धोनीने रांचीत गोळा केले आहे. त्यांच्याविरुद्ध तो फलंदाजीचा सराव करत आहे.

आगामी २०१९ चा विश्वचषक खेळणे हे धोनीचे अंतिम लक्ष्य आहे. मात्र आपण संघावर ‘बोजा’ झालो नव्हतो, हेही त्याला दाखवून द्यायचे आहे. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचा सामना करताना धोनीला हल्ली अडचण येत होती. त्याच्या फटकेबाजीला आळा बसला होता.  त्यामुळे धोनी संपला असा सर्वांचा समज होता. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या