मराठा समाजातर्फे राजकीय पक्षाची स्थापना !


ऑनलाईन वृत्तसेवा - मराठा समाजाच्या वतीने अखेर राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 'महाराष्ट्र क्रांती सेना' असे या पक्षाचे नाव आहे. आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या संघटनांनी हा पक्ष स्थापन केला आहे.
रायरेश्वर येथे मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर या पक्षाची स्थापना केली. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. नव्या पक्षाची मोर्चेबांधणी देखील सुरू केली असल्याचे सुरेश पाटील यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांचे बॅनर्स लावलेले होते.
उदयनराजे भोसले हे आगामी लोकसभा निवडणुकीत आमचे उमेदवार असू शकतात असेही पाटील यावेळी म्हणाले. महाराष्ट्र क्रांती मोर्चा पक्षाच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी विनंती करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या