मतदानाला जाताय, मग मोबाईल नेण्यास बंदी


अहमदनगर - महानगरपालिकेच्या ९ डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर आणि मतदान केंद्रांच्या आत मोबाईल फोन आणि इतर कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक यंत्र नेण्यास व वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

 त्यामुळे शहरातील मतदारांनी मतदान करण्यास येताना मोबाईल फोन अथवा इतर कुठल्याही प्रकाराचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन येऊ नये. तसेच मतदान करण्यासाठी मतदान करण्यासाठी येताना मतदारांनी मोबाईल फोन अथवा इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत आणल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची स्वतःची राहिल, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रभारी महानगर पालिका आयुक्त राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या निवडणुक शाखेचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणुक अधिकारी अरुण आनंदकर यांनी केले आहे. शनिवारी दुपारी निवडणुक कामासाठी नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या "सहकार सभागृह" येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या