नगरचे 127 जण तडीपारनगर : निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी शहरातून 127 जणांना तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शहराबाहेर राहावे लागण्याची नामुष्की या कार्यकर्त्यांवर आली आहे. निवडणूक जवळ आलेली असतांना आदेश झाल्याने गुन्हेगार चांगलेच धास्तावले आहेत. तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांनीही 102 जणांवर कारवाई करत अटी व शर्तींवर शहरात राहण्यास परवानगी दिली आहे.

तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांनी अटी व शर्तीवर प्रवेशाची कारवाई केलेल्या बहुतांश कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाच भरणा जास्त आहे. यातील बहुतांश कार्यकर्ते हे पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणातील आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांवर कारवाई झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

तडीपार केलेल्यांमध्ये विकास दिलीप शिंदे, सुदर्शन गोरख सुपेकर, गोस आयज शेख, राजू दत्तात्रय जाधव, अंकुश दत्तात्रय मोरे, सुनील दिलीप पाडळे, काशिनाथ बबन शिंदे, मनोज विठ्ठल वैरागर, राकेश विठ्ठल वैरागर, किरण दत्तात्रय बारस्कर, रोहित नारायण मिश्रा, आशिष सुधीर गायकवाड, योगेश नामदेव सोनावणे, अंकुश दत्तात्रय चत्तर, अभिजित भीमराव काळे, आनंद प्रल्हाद गिते, सचिन लक्ष्मण मुदगल, ऋषिकेश नरेंद्रसिंग परदेशी, अशोक गोकुळ शेळके, अरबाज रज्जाक बागवान, रावसाहेब आळकुटे, बाळासाहेब हराळे, राजेश बाळू बहिरट, विश्‍वास भोला रोहिदिया, शेखर देवीसिंग चव्हाण, गोरख काशिनाथ भुजबळ, बबन रामचंद्र शिंदे, गोरख मारुती भिंगारदिवे, राजेंद्र अशोक बोराडे, संजय लक्ष्मण देवकुळे, सुनील प्रभाकर साठे, योगेश नागुदास दळवी, अल्ताफ शब्बीर शेख, अनिल जनार्दन महाले, आकाश बाबासाहेब ठोंबरे, आयाज यासिम सय्यद, अमन हमीद शेख, लतीफ दाऊद शेख, संदीप घनशाम भागवत यांचा समावेश आहे.

त्यांच्यासह भाऊसाहेब बोरुडे, रमेश नेटके, राकेश शिंदे, संजय वाकचौरे, अंबादास कालिदास सरोदे, देविदास धिंडे, राजू काते, बिलाल कुरेशी, मयूर बारगळ, किरण वाळके, गोरख गायकवाड, संदीप जाधव, मोहसीन इसामुद्दीन शेख, अर्जन जंगम, शरद कचेर, अनिकेत विठ्ठल वैरागर, विश्‍वास रामसिंग वैरागर, प्रशांत किसन मोरे, विशाल मोहन शिंदे, कृष्णा सखाराम काते, राहुल शिंदे, प्रफुल्ल राजू भालेराव, परवेज वूलायस सय्यद, अलीज ऊलायज सय्यद, इक्राम आरिफ शेख, समीर आय्यद शेख, अनिल ठेरे, हनुमंत शिंदे, अजय बुलाखे, निलेश अण्णासाहेब आढाव, सागर सुरेश पठारे, सोमनाथ भानुदास गिते, भाऊसाहेब बोरुडे, फैय्याज कलीम बागवान, गौस गुलाब शेख, वसीम रफीक शेख, सलमान इजाज शेख, जावेद जॉकी फारूदखान, शेख बब्बू याकूब बागवान, आरिफ मोहम्मद शेख, जुनेद आमिर शेख यांचाही तडिपारीत समावेश आहे.

तसेच जावेद अल्ताफ शेख, मोहसीन मन्सूर शेख, किरण मकासरे, संतोष दत्तात्रय सैदर, अनिल देविदास सैदर, अक्षय आनंद धोत्रे, ओंकार रमेश घोलप, गणेश प्रभाकर यादव, विशाल संजय वलकर, सुरज संभाजी शिंदे, विजय गजानन भनगाडे, आकाश पुरुषोत्तम पिस्का, सुरज पोपट सरोदे, महेश रमेश निकम, संदीप शरद शिंदे, शाह फैसल बुर्‍हाणसय्यद, मुन्ना बापू कुरेशी, सागर पंडित गायकवाड, विकास रमेश अकोलकर, आवेज जाकीर सय्यद, सुभाष हरिसिंग ठाकूर, फुरकान शकील शेख, मोहसीन अब्बास शेख, अनिल जनार्दन महाले, आकाश बाबासाहेब ठोंबरे, अय्याज आसीन सय्यद, आमन हमीद शेख, लतीफ दाऊद शेख, संदीप घनशाम भागवत, रामसिंग अमरसिंग ठाकूर, अक्षय पवार, मोहसीन माजिद खान, बिलाल बाबू कुरेशी यांना तडीपार करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या