खुशखबर : पेट्रोल आणि डिझेलचे दर उतरणार


ऑनलाईन वृत्तसेवा - जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वेगाने घसरत आहेत. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लवकरच घट होण्याची शक्यता आहे. जरविस दिवसांमध्ये पेट्रोलचे दर ५ रुपयांनी स्वस्त झालेले होते. आता या इंधनाचे दर आणखी कमी होणार आहेत.

(आमचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा)

अमेरिकेने इराणमधून तेल आयात करण्यास निर्बंध लादले होते. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर प्रचंड भडकले होते. याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर देखील झाला होता. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर ५ ते ८ रुपयांनी वाढले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त वातावरण होते.

पण आता भारतासह युरोपातील अनेक देशांनी अमेरिकेचे निर्बंध झुगारून लावली आहेत. त्यांनी इराणमधून तेल आयात करण्यास सुरवात केली आहे. परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होऊ लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलचे दर आणखी कमी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(आमचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा)

गेले काही दिवस पेट्रोलच्या दराने भारतात नव्वदी गाठली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण होऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटी कराच्या नियंत्रणात आणण्याची मागणी होत होती. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या दरांमध्ये काय बदल होतो तसेच याबद्दल सरकार काय धोरण घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(आमचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या