आ. शिवाजी कर्डीले, आ. संग्राम, आ. अरुण जगताप यांना दिलासा; राठोडांचा निर्णय राखीवनगर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडून उपद्रवी व्यक्तींच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. नगरचे तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांच्यासमोर सुरु असलेल्या सुनावणीत आ. शिवाजी कर्डीले, आ. संग्राम जगताप व आ. अरुण जगताप यांना दिलासा मिळाला आहे.

तहसीलदारांसमोर झालेल्या सुनावणीत या तिघांचे नाव तडिपारीच्या कारवाईतून वगळण्यात आले आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड व माजी आ. दादा कळमकर यांचा वैद्यकीय अहवाल न मिळाल्याने या दोघांवर अहवाल आल्यावर कारवाई होणार आहे.

यांच्यासह सुनील त्रिंबके, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, संग्राम जगताप यांची पत्नी शीतल जगताप, भाऊ सचिन जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक समद खान यांना अटी व शर्तीला बांधील राहून शहरात राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या