विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आ.विजय औटी बिनविरोध


मुंबई : विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने औटी यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. औटी यांच्या निवडींनंतर त्यांच्या पारनेर मतदारसंघात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

काँग्रेसचे हर्षवर्धन संकपाळ, आमदार बच्चू कडू यांनी अर्ज मागे घेतले. यामुळे औटी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. औटी २००४ पासून विधानसभेवर शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातून ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

पारनेर तालुक्यातील अनेक कामे औटी यांनी मार्गी लावली आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवडीबद्दल विधानसभेत अभिनंदन केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या