..म्हणून अवनीवर गोळ्या झाडाव्या लागल्या


हैदराबाद | DNA Live24 - अवनी वाघिणीला जेरबंद करून पकडण्याची मोहीम प्रचंड कठीण होती. तरी आम्ही त्यासाठी दिवस रात्र अथक प्रयत्न केले. यासाठी आणि धोकेही पत्करले, पण अखेर आपणाला नाईलाजास्तव अवनीवर गोळी झाडावी लागली, असे स्पष्टीकरण 'अवनी' या नरभक्षक वाघिणीवर गोळी झाडणारे शार्प शूटर असगरअली खान (हैदराबाद) यांनी दिले आहे.

अवनी नावाची नरभक्षक वाघिणीला गोळ्या झाडून ठार मारल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. भाजप सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. तसेच शाप शुटर असगर अली खान यांनाही टीकेचे लक्ष करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर खान यांनी हे स्पष्टीकरण केले आहे. अवनीला जखमी करून जेरबंद करण्याचे आम्ही अनेक प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नाही, असे त्यांनी सांगितले.

या वाघिणीकडून कोणताही माणूस ठार मारला जाऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत होतो. त्याच्या शोधासाठी आम्ही दिवसरात्र अथक प्रयत्न करीत होतो. या मोहिमेमध्ये आमच्या जीवालाही धोका होता, कमळ आणि प्रचंड काळजी घेत होतो. नरभक्षक वाघ मनुष्य प्राण्याला धोकादायक असतात. त्यामुळे सरकारने आवाहन केल्यानंतर आम्ही हे जोखमीचे काम करतो, अशा शब्दात खान यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.

अवनी या नरभक्षक वाघिणीने १३ जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे या परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर तिला ठार मारण्याचा आदेश शासनाने दिला होता. त्यानंतर ही मोहीम राबवण्यात आली. आता मात्र ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)