नगरमध्ये भाजपच्या सभेचा फ्लॉप शो !, खुर्च्या रिकाम्याच..

नगर : पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत नगरमधील तुषार गार्डन येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी स्वतः ना. पंकजा मुंडे यांचे सभास्थळी आगमन झाले तरी अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्याच होत्या. महिला मेळावा असतांना रिकाम्या खुर्च्या भरण्यासाठी पुरुष कार्यकर्त्यांना बोलावण्याची वेळ भाजपवर आली.

त्यामुळे पंकजा मुंडे यांनीही जास्त राजकीय भाषण न करता कार्यक्रम आटोपण्यावर जोर दिला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष खा. दिलीप गांधी, माजी उपमहापौर गीतांजली काळे, सुनील रामदासी, छाया राजपूत आदींसह भाजपचे उमेदवार व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या, नगरमध्ये मिळत असलेला प्रतिसाद पाहता विजयाचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. महिलांना शहरात मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. महिला, मुलींना सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यामुळे भाजपची सत्ता येणे आवश्यक आहे. मोदींनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा दिला. देशातील सर्व महत्वाची खाते महिलांकडे दिली आहेत. शासनाने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

महिला बचत गटांची योजना शहराच्या बचत गटांसाठीही लागू करणार आहोत. यातून शहरातील महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळेल. महिला सक्षम करण्याचं काम आम्ही करतोय. विकास ओटीत घेण्यासाठी महिलांनी आतापासूनच तयारी करावी. ३५ महिला उमेदवार दिले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या