सत्तेत सहभागी नाही, भाजपवर अंकुश ठेवणार : आ. संग्राम जगताप


नगर :
महापौर निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठींबा दिल्यानंतर सर्वच स्तरातून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही अवाक् झाले आहेत. मात्र, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी खुलासा केला आहे. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नसून भाजपावर अंकुश ठेवण्यासाठी हा पाठींबा दिल्याचे जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

अहमदनगर महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा देत जोर का झटका धीरे से असेच काहीतरी केले आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीकडून अहमदनगरमधील नगरसेवकांन नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी खुलासा केला. शिवसेनेच्या काळात नगर शहराचा विकास खुंटला. सध्या राज्यात आणि देशात भाजपाची सत्ता असल्याने शहरविकासाकरीता निधी मिळण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय मी आणि पक्षाच्या नगरसेवकांनी घेतल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असून भाजपाला आमचा बाहेरुन पाठींबा आहे. तसेच, पक्षश्रेष्ठींनी काढलेल्या नोटीसला आपण उत्तर देऊ, असेही जगताप यांनी स्पष्ट केलंय. तसेच छिंदम – बोराटे क्लिप प्रकरणी सखोल चौकशीही मागणी त्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या