शिवसेनेला मतदान करूनही वादग्रस्त श्रीपाद छिंदमला मारहाण

मारहाण झल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रीपाद छिंदम

अहमदनगर - महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी पोलिस बंदोबस्तात महापालिकेत दाखल झालेला वादग्रस्त अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शिवसैनिकांनी सभागृहात चोप दिला. छिंदम याने निवडणुकीत हात वर करून सेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याने त्याला चोप दिल्याचे सेनेचे नगरसेवक गाडे व बोराते यांनी सांगितले. महापौर पदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांचा पराभव झाला असला तरी, नगरसेवक छिंदम पुन्हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

 आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी सगळे नगरसेवक महापालिकेत दाखल झाले. भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक सोबतच आल्याने सेनेच्या सर्वाधिक जागा असूनही महापौर पदाच्या आशा धूसर झाल्या होत्या. त्यातच बसच्या नगरसेवकही सेनेच्या विरोधात गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याने मात्र अनपेक्षितपणे सेनेच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे चिडलेल्या सेनेच्या नगरसेवकांनी छिंदमला मारहाण केली.

दरम्यान, शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे मत सेनेला दिल्यास ग्राह्य धरू नये, अशी विनंती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. तसे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

सेनेचीच विनंती - शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी मतदानासाठी मदत करण्याबाबत मला सांगितले होते. त्यानुसार मी शिवसेनेला मतदान केले. त्याचे सर्व पुरावे व शिवसेनेच्या उमेदवाराचे बोलण्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. लोकशाही मार्गाने मतदानाचा हक्क बजावत असताना मला मारहाण झाली. आता मी पोलिस स्टेशनला जाऊन संबंधितांवरुद्ध तक्रार करणार आहे, असे अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याने सांगितले.

  आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या