आ. जगताप पिता-पुत्रांनी पवारांशी गद्दारी केली : किरण काळे


नगर : 
नगरच्या मनपा निवडणुकीबाबत प्रदेशला पातळीवर माहिती देण्याचं काम मी सुरुवातीपासून केलं. जे काही चाललंय त्यावर प्रदेश स्तरावरून बारकाईने लक्ष होत. त्यानुसारच भाजपसोबत आघाडी करू नये असा आदेश होता. नगरसेवक पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश धुडकावणार नाहीत अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र आ. जगताप पिता-पुत्रांच्या आदेशानुसार नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी गद्दारी केली, अशा शब्दात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आ. जगताप पिता-पुत्रावर टीकेची झोड उठवली.

महापौर निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी आघाडी झाल्यानंतर पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. किरण काळे म्हणाले की, भाजप जातीयवादी पक्ष आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार भाजप विरोधात कठोर भूमिका घेत आहेत. आगामी लोकसभा निवडणूक जवळ आहेत. अशा परिस्थितीत नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला छेद देण्याची जी भूमिका घेतली ती खेदजनक आहे. याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. पक्ष नेतृत्वाकडून निश्चित योग्य ती कारवाई होईल. पक्षाशी प्रामाणिक राहणं अपेक्षित होत. ही गद्दारी करण्याचा जो कार्यक्रम झाला तो पक्षासाठी भूषवाह नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या