सावेडीच्या विकासासाठी नागरिकांनी परिवर्तन करावे - गांधीनगर - भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. ही विकासाची गंगा नगरमध्ये वाहण्यासाठी महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येणे आवश्यक आहे. सावेडी उपनगर ज्या वेगाने वाढत आहे; त्या मानाने येथील नागरिकांना मिळणार्‍या सुविधा तोडक्या आहेत, असे खा.दिलीप गांधी यांनी केले.

भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 6 चे उमेदवार स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, रविंद्र बारस्कर, डॉ.आरती बुगे, वंदना ताठे यांचा प्रचाराचा शुभारंभ शहर जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी यांच्या हस्ते सावेडी गावठाण येथे मारुती मंदिरात श्रीफळ वाढवून झाला.

यावेळी सावेडी गावठाण परिसरातून हजारो नागरिकांच्या उपस्थित प्रचारफेरी काढण्यात आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, अ‍ॅड.अभय आगरकर, सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, मोहन मानधना, बाळासाहेब वाकळे, विठ्ठल बारस्कर, दिलीप बारस्कर, अशोक वाकळे, जगन्नाथ बारस्कर, राजू बारस्कर, भानुदास बारस्कर, आशा कराळे, राजेेंद्र वाकळे, गजानन वाकळे आदिंसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या