वादग्रस्त वक्तव्यामुळे नगरचे पालकमंत्री राम शिंदे अडचणीत


अहमदनगर  - पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे जनावरांसाठी चारा पाण्याची मागणी केली असता राम शिंदे यांनी त्यांना अजब सल्ला दिला. ही क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे पालकमंत्री शिंदे सध्या चांगलेच कोंडीत सापडले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय होत नसल्याची तक्रार पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे केली होती. मात्र पालकमंत्र्यांनी त्यांना अजब सल्ला दिला. शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाय सुचवताना पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला अजब सल्ला दिला. जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले.

पण चारा छावण्यांसंबंधीचे आपले वक्तव्य जाणीवपूर्वक व्हायरल केले गेले. अद्याप कोठेच चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. ग्रामीण भागात अडचणीच्या काळात पाहुण्यांची मदत घेण्याचा पद्धत आहेच. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मताशी सहमत होत आपण हे वक्तव्य केले होते, अशी सारवासारव पालकमंत्री राम शिंदे यांनी नंतर केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या