मनपा निवडणूक - मतदान केंद्रावर मोबाईल फोनला बंदी


अहमदनगर - अहमदनगर शहर महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या ९ डिसेंबर २०१८ रोजी होत आहे. यावेळी ही निवडणूक विविध कारणांनी चर्चेत आहे. सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर आणि मतदान केंद्रांच्या आत मोबाईल फोन आणि इतर कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक घेऊन येण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. 

मतदान केंद्रावर मोबाईल फोन अथवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे शहरातील मतदारांनी मतदान करण्यास येताना मोबाईल फोन अथवा इतर कुठल्याही प्रकाराचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदान करण्यासाठी येताना मतदारांनी मोबाईल फोन अथवा इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत आणल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची स्वतःची राहील, असा इशारा जिल्हाधिकारी तथा प्रभारी महानगर पालिका आयुक्त राहुल द्विवेदी आणि अहमदनगर जिल्ह्याच्या निवडणुक शाखेचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणुक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिला आहे. 

निवडणुक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या "सहकार सभागृह" येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमावेळी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या