सेना उमेदवारानेच घातली छिंदमला मतदानासाठी गळ ?
अहमदनगर - महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनीच आपल्याला शिवसेनेला मतदान करण्यासाठी फोन केला होता, असा दावा वादग्रस्त अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याने केला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत छिंदमने सेनेचे उमेदवार बोराटे यांच्या वतीने मतदान केले. त्यामुळे त्यांना सभागृहातच मारहाण करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना त्यांनी ही माहिती दिली.

आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


नगरमध्ये महापौरपदाची निवडणूक वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्या मतावरून गाजली आहे. शिवसेनेचे उमेदवार बोराटे यांनी विनंती केल्यामुळेच आपण सेनेला मतदान केल्याचा दावा छिंदमने केला आहे. यामुळे राजकारण तापलं आहे. शिवसेनेच्या उमेदवारासेाबत झालेल्या फोनची एक ऑडिओ क्लीप छिंदमने सादर केली. तर ही क्लीप बनावट असल्याचे बोराटे यांचे म्हणणे आहे. याबाबत तक्रार करणाऱ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच भाजप व राष्ट्रवादीने छिंदमला शिवसेनेला मत देण्यास सांगितल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दरम्यान, श्रीपाद छिंदम याला सभागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश पीठासन अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. त्यानुसार छिंदमच्या तक्रारीवरुन फिर्याद नोंदवली जाणार आहे.

आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या