खबरदार - पोलिसांच्या रडारवर ७ हजार आरोपी


सोलापूर - जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामीण हद्दीतील ६ हजार ९२६ गुन्हेगारांची यादी करण्यात आली आहे. ज्या गुन्हेगारांवर आधीच दोन गुन्हे दाखल आहेत. त्यांनी तिसरा गुन्हा केल्यास त्यांच्यावर कायद्याने तडीपार, एमपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून ८७ गँगची माहिती घेतली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. गुन्ह्यांचे ५ प्रकार केले असून, त्यात शरीराविरुद्ध गुन्हा, मालमत्ताविरुद्ध गुन्हा, दारूबंदी व मटकाविरुद्ध गुन्हा, अवैध वाळूविरुद्ध गुन्हा असलेल्यांची यादी केली आहे. अशा आरोपींच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

एखादी व्यक्ती गुन्हेगाराची माहिती देत असताना तो दहशतीखाली असतो. सर्वसामान्य माणसांना गुन्हेगारांच्या विरोधात फिर्याद देता यावी म्हणून पोलीस खात्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल. गुुन्हेगारांना आगामी काळात गुन्ह्यांपासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

शरीराविरुद्ध २ हजार २२, मालमत्ताविरोधी ६६२, जुगार व मटका प्रकरणातील ९७३ गुन्हेगारांची, दारूबंदीमधील २ हजार ९३६ तर वाळू प्रकरणातील ३३३ गुन्हेगारांची संपूर्ण माहिती गोळा केली आहे. जिल्ह्यातील ८७ गँगची माहिती घेतली असून, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.

सध्या ६३६ गुन्हेगारांवर कारवाई सुरू असून पंढरपूर व बार्शी येथील गँगची संपूर्ण माहिती घेतली आहे, संबंधितांवर कोणती कारवाई  केली जाईल याचा अभ्यास केला जात आहे, असेही यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.ळू


वाळू वाहतुकीवर करडी नजर - वाळूसंदर्भात १८ कॉलमचे रजिस्टर केले असून, प्रत्येक पोलीस स्टेशनकडे ते असणार आहे. पोलिसांनी पकडलेल्या गाडीला व वाळूला दंड आकारून त्याचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पाठविला जातो. जाा या सर्व नोंदी रजिस्टरमध्ये नियमित ठेवल्या जाणार आहेत. बेकायदा वाळू व्यवसाय करू नये, अन्यथा सर्वांना कायद्याने मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे.

आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या