नगर जिल्ह्यात होणार १५९ शाळा खोल्यानगर :
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी शिर्डी संस्थान निधी देणार आहे. शासनाने त्याला मान्यता दिली. मात्र सात महिन्यानंतरही शिर्डी संस्थानने बांधकामासाठी शाळा खोल्यांची निवड केली नव्हती. जिल्हा परिषदेने पाठविलेल्या या यादीवर शिर्डी संस्थानने सात महिन्यांनी निर्णय घेत, १५९ शाळा खोल्यांची बांधकामासाठी निवड केली आहे. संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अगरवाल यांनी यादीवर सही केली.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानने ३० कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिलेला होता. त्यापैकी १० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. जुलै महिन्याच्या २६ तारखेला शासनाने १० कोटींच्या निधीला मंजुरी दिली. अध्यक्षा शालिनी विखे यांनी निंबोडी घटना झाल्यानंतर जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळांचा आढावा घेतला. मोडकळीस आलेल्या, दुरुस्ती करता येण्याजोग्या व नवीन बांधावयाच्या अशा शाळांची माहिती मागविली. त्यानुसार जवळपास तेराशे शाळा खोल्या बांधण्याची गरज असल्याचे लक्षात आले. जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याने विखे व उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली. शिक्षणमंत्र्यांचीही भेट घेतली. शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. शिर्डी संस्थानने जिल्हा परिषदेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शाळा खोल्यांच्या बांधकामांसाठी ३० कोटी रुपयांचा निधी देण्याचे मंजूर केले.
तालुकानिहाय मंजूर शाळा खोल्या पुढीलप्रमाणे- नेवासा : रस्तापूर, खुपटी, बाभुळवेढा, जेऊर हैबती, गणेशवाडी, गळनिंब, पिंप्रीशहाली, फत्तेपूर, नारायणवाडी, पाचुंदा. कर्जत : कोरेगाव, राशीन, टाकळी खंडेश्वरी, पिंपळवाडी, तिखी, घुमरी, दिघी, कर्जत शहर, शिंदेवाडी, भोसे. पाथर्डी : मोहटे, खरवंडी कासार, कळसपिंप्री, साकेगाव, सुसरे, टाकळी मानूर, धामणगाव, खोजेवाडी, करंजी, मिरी. कोपरगाव : बोरावके वस्ती, कारवाडी, कोकमठाण, डांगेवाडी, भास्करवस्ती, खिर्डी गणेश, ओगदी, शिवाजीनगर, रांजणगाव देशमुख, घोयेगाव, रेलवाडी कोकमठाण, अंचलगाव, करंजी, परजणेवस्ती संवत्सर, शिंदेवस्ती पढेगाव, कान्हेगाव, धोत्रे, चासनळी, कारवाडी कोकमठाण, नाटेगाव, पढेगाव, देर्डे चांदवड, पानमळा.
संगमनेर : अंभोरे, चिंचेवाडी, साकुर, कासार दुमाला, दे. ख. आखाडा, डिग्रज, कौठे धांदरफळ, गुंजाळवाडी, संगमनेर खू., भागवतवाडी. श्रीगोंदा : कोकणगाव, येळपणे, वेळू, चिंभळा, ढोकराई, घारगाव, दत्तवाडी, म्हसे, बांगर्डे, पिंपळगाव पिसा. जामखेड : सातेफळ, हापटेवाडी, फाळकेवाडी, इनामवस्ती, नाहुली, पारेवाडी, कडभनवाडी, जातेगाव, मोहरी, देवकरवाडी. नगर : खांडके, सारोळा बद्दी, भोरवाडी, नेप्ती, चिचोंडी पाटील, माथणी, पदमपूरवाडी, खातगाव टाकळी, देहेरे, धनगरवाडी. श्रीरामपूर : सूतगिरणी, हरिहरनगर उर्दू, अशोकनगर उर्दू, वांगी खुर्द, खानापूर, गळनिंब, खोकर, फत्याबाद, खंडाळा, भेर्दापूर, गोवर्धनपूर, दिघी.
शेवगाव : कऱ्हेटाकळी, शहरटाकळी, सामनगाव, मजलेशहर, खामगाव उर्दू, चापडगाव, ढोरजळगाव, मुंगी, राखेंफळ, राक्षी. अकोले : गणोरे, नायकरवाडी, हिवरगाव आंबरे, शेलद, रेडे, धामणवड पाटीलवाडी, शिरपुंजे देवचीवाडी, तांभोळ, खडकी खुर्द, देवठाण. पारनेर : वाळवणे, घाणेगाव, अळकुटी, पवळदरा, पारनेर मुली, वरखेड मळा, गणेशवाडी रायतळे, वडनेर, कळस, डेरेशिवार. राहुरी : जुंदरेवाडी, लाख, मालुंजे खुर्द, गोटुंबे आखाडा, हनुमानवाडी, करंजगाव, बाभुळगाव, खडांबे बु., महारुख वस्ती, डुक्रेवाडी, आंग्रेवाडी, पुलवाडी, कोकाटेवस्ती, रामपूर. राहाता : शिंगवे जाधव वस्ती, पुणतांबा, कोकणेवस्ती, सदाफळ क्लास, वाळकी, इनामके वस्ती, लक्ष्मीवाडी, केलवड, मोठेबाबा, अस्तगांव मराठी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या